नागपूर कुणी वसवलं? गोंड राजे ते भोसले — खरा इतिहास
“नागपूर कुणी वसवलं?” — बहुतेक नागपूरकर उत्तर देतील: भोसल्यांनी. काही जण रघुजी भोसल्यांचं नाव घेतील. पण ऐतिहासिक नोंदी वेगळं सांगतात. नागपूर शहर वसवलं ते देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शाह याने — साधारण सन १७०० च्या सुमारास. रघुजी भोसले नागपुरात आले ते त्यानंतर जवळपास चाळीस वर्षांनी, आणि तेही स्वारी करून नाही — त्यांना चक्क बोलावण्यात…
